Jasprit Bumrah : मोठया ब्रेकनंतर टीम इंडियाच मैदानावर उतरणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी बांगलादेशविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. तर विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 58 धावांची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराह करणार महाविक्रम


विराट कोहलीबरोबरच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवरही चाहत्यांचं लक्ष असणार आहे. जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक महाविक्रम नावावर करु शकतो. 30 वर्षांचा यॉर्कर किंग बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेटचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी बुमराहला केवळ तीन विकेटची आवश्यकता आहे. बुमराहच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 397 विकेट जमा आहेत.


बुमराहची क्रिकेट कारकिर्द


भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या कसोटीत म्हणजे चेन्नई कसोटीतच बुमराह 400 विकेट टप्पा पूर्ण करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराहने भारतासाठी आतांपर्यंत 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. तर 36 कसोटी सामन्यात 159 विकेट त्याच्या नावावर आहे. याशिवाय 89 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्या त्याने 149 विकेट घेतल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज 1. अनिल कुंबळे - 953 विकेट 2. रविचंद्रन अश्विन - 744 विकेट 3. हरभजन सिंह - 707 विकेट 4. कपिल देव - 687 विकेट 5. झहीर खान - 597 विकेट 6. रवींद्र जडेजा - 568 विकेट 7. जवागल श्रीनाथ - 551 विकेट 8. मोहम्मद शमी - 448 विकेट 9. ईशांत शर्मा - 434 विकेट 10. जसप्रीत बुमराह - 397


विकेट बुमराहच्या नावावर धावांचा विक्रम


भारताचा प्रमख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर कसोटी सामन्यात एकाच षटकात 35 धावा करण्याचा विक्रम जमा आहे. बुमराहने जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंघम कसोटी सामन्यात वेगावन गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 35 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यात एका षटकात 35 धावा करणारा बुमराह हा भारताचा पहिला फलंदाज आहे. याआधी हार्दिक पांड्याने 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 26 धावा केल्या होत्या. तर कपिल देव यांनी 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच षटकात 24 धावा केल्या होत्या.