वन डेनंतर टी20 तही `सूर्य अस्त`, फक्त आयपीएलमध्येच तळपते `मिस्टर 360` ची बॅट
Suryakumar Yadav: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टी20 मालिकेतही सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावांचा ओघ निघालेला नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप ठरत आहे.
Suryakumar Yadav T20, ODI, Test Form Analysis: मिस्टर 360 डिग्री, स्काय अशा वेगवेगळ्या उपध्यांनी त्याला गौरवण्यात आलं. याला कारणही तसंच होतं. आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट सूर्यासारखी तळपली. आयपीएलमधल्या (IPL) कामगिरीच्या जोरावर सूर्याला टीम इंडियात संधी मिळाली. टीम इंडियाला (Team India) मध्यल्या फळीतला एक आक्रमक फलंदाज मिळाला अशीच चाहत्यांची अपेक्षा होती. पण नेमकं उलट घडतंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सुर्या सपशेल फ्लॉप ठरतोय. वेस्ट इंडिज दौऱ्यात सुर्या धावांसाठी झुंजताना दिसत आहे. टी20 क्रिकेट क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर आहे. पण या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात तो सध्या अपयशी ठरतोय.
एकदिवसीय मालिकेत विंडीजच्या कमकुवत बॉलिंगचा सूर्या चांगलाच समाचार घेईलअसं वाटत होतं. पण ब्रिजटाऊनमध्ये खेळलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 24 आणि 19 धावा करता आल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 351 धावांचा डोंगर उभा केला. सूर्याने 35 धावांची खेळी केली. टी20 स्पेशल सूर्या पहिल्या टी20 सामन्यात चमकेल असं वाटत होतं. पण पहिल्या सामन्यात सूर्या 21 चेंडूत 21 धावा करन पॅव्हेलिअनमध्ये परतला.
आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात सूर्यकुमार यादवने 16 सामन्यात 181.14 च्या स्ट्राईकरेटने तब्बल 605 धावा केल्या. सूर्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 139 सामने खेळला आहे आणि यात त्याच्या नावावर 3249 जमा आहेत. आयपीएलमधल्या या कामगिरीच्या जोरावर सूर्याचा टीम इंडियात समावेश होणं स्वाभाविक होतं. झालं ही तसंच. विंडिज दौऱ्या सुर्याला टीम इंडियात संधी देण्यात आली.
बदलत्या क्रमवारीचा फटका?
सूर्याच्या फ्लॉप कामगिरीमागे फलंदाजीचा सातत्याने बललेली क्रमवारी कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्य एकदिवसीय सामन्यात सूर्या तिसऱ्या क्रमांवर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो सहाव्या क्रमांकवर खेळला. तर विंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत सातत्याने प्रयोग केले जात आहेत. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत आहे.
टी20 सामन्यात बदलती क्रमवारी
फक्त टी20 सामन्यांबाबत बोलायचं झालं तर सूर्याने सलामीलाही फलंदाजी केलीाहे. चार सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी करत 135 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तो 11 वेळा खेळला असून यातत्याने 334 धावा केल्या आहेत. चौथा क्रमांक हा सूर्याचा फेव्हरेट आहे. या क्रमांकावर तो सर्वाधिक 28 वेळा खेळला आहे. सर्वाधिक धावाही त्याने याच क्रमांकावर खेळताना काढल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्याने तब्बल 1102 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर तो 4 सामने खेळला असून यात त्याने 125 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यात ठरतोत अपयशी
पण टी20 चा हा स्टार फलंदाज एकदिवसीय सामन्यात मात्र अपयशी ठरतोय. सूर्या आतापर्यंत 26 एकदिवसीय सामने खेळलाय आणि यात त्याला फक्त 511 धावा करता आल्या आहेत. तर सूर्या केवळ एक कसोटी सामना खेळला असून त्याला फक्त 8 धावा करत आल्या आहेत.