Cricketer Retirement News: एशिया कप (Asia Cup) आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाची बांधणी करताना दिसतंय. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्याचे प्रयोग सुरु आहेत. यातल्या काही खेळाडूंनी टीम इंडियात (Team India) आपली जागाही पक्की केली आहे. पण एकीकडे युवा खेळाडूंना संधी दिली जात असताना दुसरीकडे दिग्गज खेळाडूंना मात्र आपली जागा कायम ठेवण्यासाठी तडजोड करावी लागतेय. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू संघाबाहेर गेले आहेत किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. आता टीम इंडियातल्या अशाच एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावूक पोस्ट लिहित निवृत्ती
भारताचा दिग्गज फलंदाज मनोज तिवारीने (Manoj Tiwary) क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटला मनोज तिवारीने राम राम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणातच मनोज तिवारीने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं होतं. पण टीम इंडियात तो आपली जागा पक्की करुन शकला नाही. क्रिकेटच्या मैदानातून त्याने राजकारणाच्या मैदानावर नवी इनिंग सुरु केली. पश्चिम बंगालमधल्या ममता सरकरामध्ये मनोज तिवारी क्रीडा मंत्री आहे. गेली आठ वर्ष तो टीम इंडियापासून दूर आहे. मनोज तिवारी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. पण आपल्या खेळात तो सातत्या ठेवू शकला नाही. 


2015 मध्ये शेवटचा सामना
मनोज तिवारी टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2015 मध्ये खेळला होता. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मनोज तिवारीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मनोज तिवारी भारतासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने 26.09 च्या स्ट्राईक रेटने 287 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 104 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 3 टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर केवळ 5 धावा जमा आहेत. 


आयपीएलमध्ये चांगली कामगिरी
मनोज तिवारी (Manoj Tiwary) टीम इंडिया (Team India) शिवाय आयपीएलमध्येही खेळला आहे. आयपीएलमध्ये मनोज तिवारीचा रेकॉर्ड चांगला आहे. मनोज तिवारी कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders), राईजिंग पुणे सुपरजायंट (Rising Pune Supergiant) आणि किंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये तो तब्बल 98 सामने खेळला असून 28.72च्या स्ट्राईक रेटने 1,695  धावा केल्या आहेत. यात सात अर्धशतकांचा समावेश आहे.