Ishan Kishan IPL 2024 : भारतीय  क्रिकेट संघाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan) सध्या टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ईशान किशनचा नक्की काय प्लान आहे याची खबर भारतीय क्रिकेट मंडळालाही (BCCI) नव्हती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशक्षिक राहुल द्रविड यांनी ईशान स्थानिक क्रिकेटपमधून परतेल अशी माहिती दिली होती. पण यानंतरही तो रणजी ट्रॉफित (Ranji Trophy) खेळताना दिसला नाही. या दरम्यान ईशान किशन सापडला तो थेट गुजरातमध्ये. ईशान बडोद्यात हार्दिक पांड्याबरोबर किरण मोरे क्रिकेट अकादमीत (IPL 2024) सराव करताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयचा दणका
बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक सूचना जारी केली. जे खेळाडू दुखापतग्रस्त नसताना टीम इंडियातून बाहेर आहेत. त्यांनी संघात पुनरागमन करण्याधी स्थानिक क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. खेळाडूंनी या नियमांचं पालन केलं नाही तर अशा खेळाडूंवर कारवाई होऊ शकते, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. त्यामुळे ईशान किशनकडे कोणताही पर्याय उरला नाही. आता आयपीएलआधी ईशान किशन डीवाय पाटील स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ईशान किशनने ब्रेक घेतल्याचं सांगितलं जात होतं. पण ईशान बडोद्यात आयपीएलचा सराव करताना दिसल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज आहे. 


बीसीसीचा करार रद्द?
ईशान किशनच्या गैरवर्तनामुळे बीसीसीआयकडून त्यााच सेंट्रल कॉन्ट्रेक्टही रद्द होण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या काळापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. तसंच तो स्थानिक क्रिकेटही खेळत नाहीए. ईशान किशन सेंट्रल कॉन्टॅक्टच्या सी कॅटेगरीत आहे. या कॅटेगरीतल्या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात. 


आयपीएलचा सराव


आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला ईशान किशन थेट आयपीएल सरावात गुंतला आहे. हार्दिक पांड्याबरोबर तो बडोद्यात सराव करतोय. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. आणि ईशान किशनही मुंबई इंडियन्समधून खेळतो. 


ईशान किशनची क्रिकेट कारकिर्द
ईशान किशन हा टीम इंडियाचा ऑल फॉर्मेट खेळाडू आहे. ईशान भारतासाठी आतापर्यंत 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी20 सामने खेळला आहे. दोन कसोटी सामन्यात त्याने 78, तर 27 एकदिवसीय सामन्यात त्याने 933 धावा केल्या आहेत. तर टी20 सामन्यात त्याच्या नावावर 796 धावा जमा आहेत.