Dhruv Jurel: टीम इंडियाने रांची कसोटी जिंकत इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. या कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कठिण काळात ध्रुव जुरेल खेळपट्टीवर लढवय्यासारखा उभा राहिला आणि त्याने टीम इंडियाला (Team India) ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर 23 वर्षांचा ध्रुव जुरेल हिरो बनला आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने केलेल्या खेळीचं कौतुक केलं जात आहे. सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गजांनी ध्रुवचं कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ध्रुव जुरेलबरोबर स्कॅम
रांची कसोटीत ध्रुव जुरेल प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. ध्रुव जुरेलवर कौतुकांचा आणि बक्षिसांचा वर्षाव होतोय. पण या दरम्यान त्याच्याबरोबर एक मोठा स्कॅमही झाला. वास्तविक ध्रुव जुरेलच्या मॅच विनिंग खेळीनंतर एमजी हेक्टर या कंपनीने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे ध्रुव जुरेलला महागडी एमजी हेक्टर ही कार गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा पसरली. 


काय होतं त्या ट्विटमध्ये?
MG हेक्टर कंपनीने ध्रुव जुरेलचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एमजी हेक्टर कंपनीने (MG Hector) म्हटलं होतं 'विकेटच्या मागे तर तूला पाहिलं, आता आम्हाला तुला या कारच्या स्टिअरिंगमागे बसलेलं पाहिलं आवडेल' असं म्हटलंय. या पोस्टबरोबर ध्रुवचा आणि एमजी हेक्टरचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे एमजी हेक्टर कंपनी ध्रुव जुरेला कार गिफ्ट करणार असल्याचा कयास सर्वांनी लावला. एमजी हेक्टरचं व्हेरिफाईड अकाऊंट असल्याने सर्वांना खरंही वाटलं. 


ती ठरली केवळ अफवा
पण ही केवळ अफवा ठरली. ध्रुव जुरेलला एमजी हेक्टर कार बक्षित म्हणून मिळाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर एमजी हेक्टर कंपनीने आपल्या अधिकृत पेजवरुन ती पोस्टच डिलीट करुन टाकली. ध्रुव जुरेलला केवळ शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट केल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं. 


ध्रुव जुरेलचा संघर्ष
मोठ्या संघर्षानंतर ध्रुव जुरेलने टीम इंडियात आपली जागा मिळवली आहे. जुरेलची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ध्रुवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, पण त्याच्याजवळ बॅट आणि क्रिकेट किट घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी त्याच्या आईने आपले दागिने विकले. ध्रुव जुरेलचे वडिल भारतीय लष्करात होते. कारगिल युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. वडिलांप्रमाणेच ध्रुव जुरेल रांची कसोटीत लढला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.