क्रिकेट इतिहासातील ते 5 खेळाडू ज्यांनी बदलली आपली `ओळख`, यादीत 2 भारतीयांचा समावेश
क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत.
मुंबई : क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. येथे कोणाच्या हातातून आलेला खेळ निसटून जाईल किंवा खेळ कसा पलटेल, हे कोणालाच सांगता येणार नाही. येथे खेळाडूंसोबत असं बऱ्याचदा होताना तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या बॉलरवर जेव्हा बँटिंग करण्याची जबाबदारी पडते तेव्हा मात्र त्याला आपला खेळ दाखवायला लागतो. असं बऱ्याच खेळाडूंसोबत घडलं आहे. आपला खेळ हा खेळाडूची ओळख असते, परंतु बऱ्याच क्रिकेटरने आपली ओळख बदलली आहे. म्हणजेच त्यांनी आपला खेळ बदलला आहे. ज्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी देखील केली आहे.
क्रिकेटमध्ये काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, परंतु नंतर ते यशस्वी फलंदाज बनले. ज्यामुळे या खेळाडूंनी क्रिकेट विश्वात आपली नवीन ओळख बनवली.
चला तर मग अशा 5 क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया, जे गोलंदाजानंतर यशस्वी फलंदाज बनले आहेत. यामध्ये दोन भारतीय खेळाडूंचं देखील नाव आहे.
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू स्टीव्ह स्मिथचा सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला होता. त्याची तुलना महान शेन वॉर्नशी केली जात होती, पण नंतर या खेळाडूने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि आजच्या काळात हा खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक दिग्गज खेळाडू बनला आहे.
रवी शास्त्री
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. रवी शास्त्री यांनीही भारतासाठी १०व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. परंतु त्यानंतर त्यांनी हातात बॅट घेतली आणि त्यांच्या बॅटीने ही कमाल दाखवली. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 15 शतके झळकावली.
रवी शास्त्रीने 80 कसोटी सामन्यात 35.79 च्या सरासरीने 3830 धावा केल्या आहेत आणि 150 एकदिवसीय सामन्यात 3108 धावा केल्या आहेत.
शोएब मलिक
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकने 1999 मध्ये ऑफ-स्पिनर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण, नंतर त्याच्या गोलंदाजीशिवाय, त्याने आपल्या फलंदाजीवर देखील लक्ष केंद्रित केले आणि आजच्या काळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत.
मनोज प्रभाकर
मनोज प्रभाकरने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर आणि सलामी गोलंदाज म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. मनोज प्रभाकर यांनी गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली, पण नंतर ते एक जबरदस्त फलंदाजही बनले. मनोज प्रभाकर यांनी 38 कसोटी सामन्यात 39.36 च्या सरासरीने 1968 धावा केल्या आहेत.
सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने आपल्या कारकिर्दीला फिरकीपटू म्हणून सुरुवात केली आणि कारकिर्दीच्या अखेरीस तो जागतिक क्रिकेटचा महान फलंदाज बनला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्याच्या नावावर १३ हजारांहून अधिक धावा आहेत, तर कसोटी क्रिकेटमध्येही या खेळाडूच्या नावावर ६९७३ धावा आहेत.