Ravichandran Ashwin Statement: भारताचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची कर्णधारपदावरुन तुलना करणारं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) तीनवेळा आयसीसी ट्ऱॉफीचं जेतेपद पटकावलं आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 विश्वचषक स्पर्धा 2007, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2011 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2013 बाजी मारली होती. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित की धोनी कोण बेस्ट?
आर अश्विनने महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत तुलना केली आहे. एका मुलाखतीत बोलताना अश्विनने सांगितलं, भारतीय क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तर प्रत्येक जण सांगेल महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे. पण माझ्या मते रोहित शर्मा एक सर्वोत्तम व्यक्ती आहे. रोहित शर्मा संघातील प्रत्येक खेळाडूला समजून घेतो. प्रत्येक खेळाडू्च्या आवडी-निवडीबाबत रोहित शर्माला माहित असतं. खेळाडू आणि  रोहित शर्मामध्ये चांगलं बॉण्डिंग आहे. रोहित शर्माची जमेची बाजू म्हणजे तो संघातील प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असं धोनीने सांगितलं. 


आर अश्विन विश्वचषक 2023 स्पर्धेत केवळ एक सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या म्हणजे 8 ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अश्विन खेळला होता. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा अश्विनला बेंचवर बसावं लागलं. पण याबाबत अश्विनला कोणतीही तक्रार नाही. कर्णधाराच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर रोहित शर्मा आपल्या जागी ठिक होता. आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याबाबत विचार केला जाऊ शकत नव्हता. संघात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज असा फॉर्म्युला ठरला होता. 


तीनही वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत होते. या संघात तिसऱ्या फिरकी गोलंदाजाला संधी नव्हती त्यामुळे मला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही असं अश्विनने स्पष्ट केलं. 


अश्विनची कसोटी संघात निवड
दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या कसोटी संघात आर अश्विनची निवड करण्यात आली आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा.