लंडन : वर्ल्डकप २०१९ स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. विशेष म्हणजे इंग्लंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेला नाही. टीम इंडियाने वर्ल्डकप २ वेळेस पटकावला आहे. तर एका वेळेस उपविजेतेपद मिळालं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने आपण काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत.


क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वात वर्ल्ड चॅम्पियनशीपची सुरुवात १९१२ ला करण्यात आली. ही सुरुवात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांद्वारे करण्यात आली. 


या वर्ल्डकप चॅम्पियनशीपचे रुपांतर १९७५ ला टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या टीमसाठी स्पर्धेच्या रुपात आणल गेलं. पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या एकूण ६ देशांचा सहभाग होता. 


यामध्ये  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्टइंडीज, भारत आणि पाकिस्तान या देशांचा सहभाग होता. या व्यतिरिक्त श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका या टीमचा देखील सहभाग होता.


क्रिकेट वर्ल्डकपची सुरुवात १९७५ साली झाली. आतापर्यंत एकूण ११ वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाने केली आहे. 


ऑस्ट्रेलियाने ५ वेळा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने १९९९ पासून ते २००७ या दरम्यान ३ वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात आल्या. 


हे तीन्ही वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानेच जिंकले. यासोबतच त्यांनी वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक साजरी केली. तसेच ऑस्ट्रेलिया गतविजेती वर्ल्डकप टीम देखील आहे. 


भारत आणि वेस्टइंडीजने प्रत्येकी २ वेळा तर, श्रीलंका आणि पाकिस्तानने प्रत्येकी १ वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.


 


                                   वर्ल्डकप विजेता संघ   


                     वर्ष               विजेता                  उपविजेता 
                    १९७५            वेस्‍टइंडीज                   ऑस्‍ट्रेलिया
                    १९७९            वेस्‍टइंडीज                    इंग्लंड 
                    १९८३              भारत                 वेस्‍टइंडीज
                    १९८७            ऑस्‍ट्रेलिया                    इंग्लंड 
                    १९९२             पाकिस्‍तान                     इंग्लंड  
                    १९९६              श्रीलंका                  ऑस्‍ट्रेलिया 
                    १९९९            ऑस्‍ट्रेलिया                   पाकिस्‍तान 
                    २००३            ऑस्‍ट्रेलिया                     भारत
                    २००७             ऑस्‍ट्रेलिया                   श्रीलंका 
                    २०११                भारत                     श्रीलंका  
                    २०१५            ऑस्‍ट्रेलिया                    न्यूझीलंड 

     


क्रिकेट विश्वात सर्वात आधी वेस्टइंडिजचा बोलबाला होता. वेस्टइंडिजने आपले वर्चस्व गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ही मक्तेदारी घेतली. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील तगडी टीम म्हणून समोर आली. 


तेव्हाच्या काळात क्रिकेटर्स पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळायचे. तसेच लाल बॉलचा उपयोग केला जायचा. ७ जून १९७५ पासून पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली होती. पहिला वर्ल्डकप ७ ते २१ जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. विशेष म्हणजे तेव्हा ६० ओव्हरची मॅच खेळण्यात येत असे. 


या वर्ल्डकपमधील पहिला सामना हा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. या मॅचमध्य लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी १७४ बॉलमध्ये नाबाद ३६ धावा केल्या होत्या. 


१९७५ चा पहिला वर्ल्डकप वेस्ट इंडिजने जिंकला. वेस्टइंडिजने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती.