WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट
ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत.
ICC World Test Championship WTC Points Table : साउथ अफ्रीका के खिलाफ न्यूजीलैंड की जीत के बाद ICC की वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप की पॉइंट्स टेबल में एक बड़ा फेरबदल हुआ है. इसने भारतीय टीम की टेंशन बढ़ा दी है. साथ ही न्यूजीलैंड क्रिकेट टीम ने अपनी टॉप पोजिशन मजबूत कर ली है. जबकि भारतीय टीम को टॉप पोजीशन के लिए काफी जोर लगाना होगा.
ICC World Test Championship WTC Points Table: आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिटनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर धाला आहे. डब्ल्यूटीसीच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याचं भारताचं स्वप्न आणखी बिकट झालंय. पॉईंट टेबलमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) अव्वल स्थान गाठलं आहे. न्यूझीलंडने आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 कसोटी सामन्यांची मलिका खेळवण्यात आली होती. ही मालिका न्यूझीलंडने 2-0 अशी जिंकली. या मालिका विजयाबरोबरच न्यूझीलंडने WTC पॉईंटटेबलमधअये 75 अंक मिळवत अव्वल स्थान मजबूत केलंय.
टीम इंडियाला किती संधी?
WTC पॉईंट टेबल यादीत ऑस्ट्रेलिया (Australia) दुसऱ्या आणि भारत (India) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 55 अंक आहेत. तर भारतीय क्रिकेट संघाच्या खात्यात 52.77 अंक जमा आहेत.
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंजविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. हा कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या खात्यात 59.52 होतील. म्हणजे राजकोट कमोटी सामना जिंकत WTC पॉईंटटेबलमध्ये दुसरं स्थान गाठण्याची टीम इंडियाला चांगली संधी आहे. पण अव्वल स्थान पटकावण्यासाठी टीम इंडियाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
इंग्लंड क्रिकेट संघाला फायदा
न्यूझीलंडच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयाचा इंग्लंड संघाला चांगलाच फायदा झाला आहे. इंग्लंड संघ आठव्या क्रमांकावर सातव्या क्रमांकाव पोहोचला आहे. तर कसोटी मालिका पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. श्रीलंका सर्वात तळाला म्हणजे नवव्या क्रमांकावर आहे.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कसे पॉईंट मिळतात?
कसोटी सामना जिंकल्यास त्या संघाला 12 अंक दिले जातात. तर सामना टाय झाल्यास 6 आणि ड्रॉ झाल्यास प्रत्येकी 4 अंक देण्यात येतात. कसोटी सामना हरल्यास एकही अंक मिळत नाही. म्हणजे 5 कसोटी सामन्यांची मालिक असेल तर पूर्ण 60 अंक देण्यात येतात.
राजकोट कसोटी सामना
दरम्यान राजकोट कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 445 धावा केल्या. भारतातर्फे रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतकी खेळी केली. रोहित शर्माने 131 तर रवींद्र जडेजाने 112 धावा केल्या. याला उत्तर देताना इंग्लंड संघाने दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने 2 विकेट गमावत 207 धावा केल्या. सलामीला आलेल्या बेन डकेतने नाबाद 133 धावा केल्या. यात त्याने 2 फोर आणि तब्बल 21 चौकार लगावले. भारतातर्फे आर अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली.