मुंबई : क्रिकेटपटू दिनेस कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी त्यांच्या या वैवाहिक नात्यात दोन गोंडस बाळांचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी सर्वांच्या भेटीला आणत या आनंदात क्रीडा विश्वातील या जोडीनं चाहत्यांनाही आपल्या या आनंदात सहभागी करुन घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक सध्या त्याच्या आयुष्यात आनंददायी पर्वाचा अनुभव घेत असला, तरीही त्याच्या खासगी आयुष्यात मात्र एक काळ असा होता, जेव्हा दिनेश कार्तिकला काही अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागला होता. 


कार्तिकला त्याचीच पूर्वाश्रमीची पत्नी निकिता आणि मित्र मुरली विजय यांनी फसवलं होतं. भावनिकरित्या हे सारं दिशेश कार्तिक याला पूर्णपणे खचवणारं होतं. 


2007 मध्ये दिनेश आणि निकिता विवाहबंधनात अडकले होते. या दोघांचेही वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. ज्यामुळं त्यांनी ही मैत्री नात्यात बदलण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये ज्यावेळी दिनेश विजय हजारे ट्रॉफीसाठी खेळत होता, त्याचवेळी त्याला त्याची तेव्हाची पत्नी आणि क्रिकेटपटू मुरली विजयसोबतच्या अफेअरची माहिती मिळाली होती. 


वैवाहिक नात्यात इतका मोठा विश्वासघात झालेला असताना अखेर दिनेश आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला. हे सर्वकाही सर्वांसमोर यायला फारसा वेळ लागला नाही. 


पुढे निकिता गरोदर राहिली आणि तिनं मुरली विजय याच्याशी लग्नगाठही बांधली. खासगी आयुष्यात आलेल्या या वादळाला दिनेश कार्तिक सामोरं गेला तोही मोठ्या धीरानं. 


दिनेश कार्तिकनं जाहीरपणे या प्रकरणावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. त्यानं पत्नीबाबतही काहीच प्रतिक्रियाही दिली नाही. अतिशय शांततेत तो या नात्यातून वेगळा झाला. 


पुढे 2015 मध्ये त्याची ओळख दीपिका पल्लीकलशी झाली. जिच्या रुपात त्याला खरं प्रेम आणि मैत्रीणही भेटली. त्याच वर्षी या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.