दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीर क्रिेकेटसोबत काही सामाजिक कार्य देखील अतिशय गंभीरतेने पार पाडतो. गौतम गंभीर मागील काही दिवसांपासून अशी अनेक कामं करत आलेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे. एवढंच नाही काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एएसआय अब्दुल रशीद यांची मुलगी जोहराला केलेली मदत. गंभीरने देशात सर्वांचंच मन जिंकलं आहे.


एका कार्यक्रमात गौतम गंभीरने कपाळावर टिकली आणि खांद्यावर ओढणी घेतली. हा गौतम गंभीरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकांना हा फोटो पाहून हाच प्रश्न पडतोय की नेमकं चाललंय काय? पण लोकांना जेव्हा या फोटोमागची कहाणी माहित झाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आणि त्यांनी गौतम गंभीरची वाह वा केली.


दरम्यान, गौतम गंभीर दिल्लीत 'हिजरा हब्बा' यांच्या सातव्या संस्करणाच्या उद्घाटनाला पोहोचले होते. तृतीयपंथी समाजाला समर्थन व्यक्त करण्यासाठी गौतम गंभीरने कपाळावर मोठी टिकली आणि डोक्यावर ओढणी घेतली. हा पेहराव करण्यासाठी तृतीयपंथांनी गौतम गंभीरला मदत केली.


हा समारोह भारतीय दंड संहिताच्या कलम ३७७ ला संपवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्वाळ्यानंतर, आयोजित करण्यात आला होता. ३७७ प्रमाणे समलैंगिक संबंधांना अपराध मानलं जात होतं. हा निर्णय ६ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आला.


गौतम गंभीरने याच वर्षी दोन ट्रान्स जेंडर्सना आपली बहिण मानून राखी देखील बांधून घेतली. गंभीर यांनी हा फोटो आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे.