मुंबई : क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सामाजिक मुद्दयांवरून आपलं मत ते सोशल मीडियावर नेहमी मांडत असतात. आधी एकदा मोहम्मद कैफने धर्म आणि जातीयतेच्या विरोधात तिरस्कार करणारं ट्विट केलं होतं. ज्याची काही जणांकडून खूप प्रशंसा झाली होती.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरनाथ तीर्थयात्रेवर झालेल्या दहशवतवादी हल्ल्यात काही लोकांनी मुसलमानांच्या यात्रा थांबवून ठेवण्याची गोष्ट केली होती. या हल्ल्यानंतर दोन्ही धर्माच्या काही लोकांकडून तिरस्काराची भाषा बोलली गेली. तिरस्कार करणाऱ्या या लोकांना मोहम्मद कैफने सुनवलं आहे.

मोहम्मद कैफने एका ट्विटमध्ये म्हटलं की, लावा जातीयतेचे लेबल रक्तावर पण, बघुया किती लोक रक्त घेण्यास नकार देतात. कैफचं हे ट्विट अनेक लोकांना खूप आवडलं. कैफच्या या ट्विटला सगळेच सकारत्मक प्रतिक्रिया देत होते. त्याच्या या ट्विटची लोकं प्रशंसा करत होते.


 



या आधीपण मोहम्मद कैफने अशाच काही विषयांवर मोकळेपणाने आपले मत मांडले. सूर्य़ नमस्काराच्या मुद्दयांवर देखील कैफने मनमोकळेपणे मत मांडलं होतं. धर्मावरुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना कैफने सुनावलं आहे.