लग्न होण्याआधी या गोष्टीच्या मोहात कोहलीने जीव धोक्यात टाकला होता, असा बचावला होता कोहली
विराट कोहलीने (virat kohli) नक्की कशासाठी जीव धोक्यात घातला होता? वाचा.
मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) , टीम इंडियाचा आणि क्रिकेट विश्वातील टॉपचा क्रिकेटर. विराट फिट राहण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतो. त्यामुळे विराट एकदम फिट आहे. मात्र विराट आज जितका आपल्या फिटनेसबाबत सतर्क आहे, तितकाच तो काही वर्षांपूर्वी नव्हता. विराट ज्यूनिअर क्रिकेटच्या वेळेस असा नव्हता. विराटला तेव्हा चिकू या नावाने आवाज द्यायचे कारण तेव्हा तो जाड होता. (cricketer pradeep sangwan reveals story about virat kohli risked his life for mutton rolls)
विराटला तेव्हा मसालेदार आणि फास्ट फूड खाण्याची प्रचंड आवड होती. विराट जेव्हा केव्हा कोणत्या शहरात किवा परदेशात जायचा, तेव्हा लोकल फूड खायचा. विराटने एकदा तर या फास्ट फूडसाठी जीव धोक्यात टाकला होता. विराटने मटण रोलसाठी जीव धोक्यात घातला होता. विराट कोहलीचा क्रिकेटर मित्र प्रदीप सांगवानने (Pradeep Sangwan) हा किस्सा सांगितला आहे.
विराट मटण रोल खाण्यासाठी धोकादायक ठिकाणी गेला होता. यावेळेस काही अज्ञातांनी विराटचा पाठलागही केला होता. हा किस्सा अंडर 19 क्रिकेटच्या वेळेसचा आहे. प्रदीप सांगवानने इंडियन एक्सप्रेसमध्ये हा किस्सा लेखाद्वारे मांडला आहे.
"ज्यूनिअर क्रिकेटच्या वेळेस कोहली माझ्यासोबत 7-8 वर्ष राहिला होता. विराटला स्ट्रीट फूड विशेष कोरमा रोल, चिकन रोल फार आवडायचंय. एकदा आम्ही अंडर 19 टीमसह दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. तेव्हा इथे मटण रोल फार चांगला मिळतो, पण ती जागा सुरक्षित नसल्याचं विराटला कोणीतरी सांगितलं. यानंतर टीमच्या ड्रायव्हरनेही हेच सांगितलं", असं सांगवनने सांगितलं.
"विराटने यानंतरही मला त्या जागी मटण रोल खाण्यासाठी जाऊयात, यासाठी माझ्याकडे आग्रह केला. विराटने मला तिथे जाण्यासाठी मनधरणी केली. त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि मटण रोल खाल्लं. ड्रायव्हरने सांगितलेल्या त्या घटनेमुळे मी फार घाबरलेलो. पण विराट इरेलाच पेटला होता. अखेर तिथे गेलो अन मटण रोल खाल्ला. या दरम्यान काही अज्ञातांनी आमचा पाठलाग केला. मात्र आम्ही वेळीच गाडी घेऊन थेट हॉटेलच्या दिशेने निघालो अन् गाडी थेट हॉटेलातच थांबवली", असा हा थरार प्रदीप सांगवनने सांगितला.