मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत करत क्रिकेटर रोहित शर्माच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. त्याची पत्नी रितिका हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि रोहितच्या आयुष्यात आनंदाची उधळण झाली. याच कारणास्तव सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितवर शुभेच्छांचा वर्षावही केला. ज्यानंतर आता रोहितने अशीच एक सुरेख बातमी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनोख्या अंदाजात त्याने आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. सोबतच त्याने आपल्या मुलीचं नाव जाहीर करत एक गाणंही ट्विट केलं आहे. 'गर्ल्स लाइक यू' या गाण्याची लिंक त्याने या ट्विटमध्ये जोडली आहे. रोहित आणि रितिकाच्या लाडक्या लेकीचं नाव आहे समायरा. 


रोहितने समायराबरोबरचा फोटो शेअर करत आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याची भेट सर्वांसोबत घडवून आणली आहे. या फोटोमध्ये रितिकाच्या हातात चिमुरडी समायरा असून, रोहित आणि खुद्द रितिका तिच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने रोहितच्या कुटुंबाचा त्रिकोण आता पूर्ण झाला, असं म्हणायला हरकत नाही. 




समायराचा जन्म झाला त्यावेळी रोहित भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. पण मुलीच्या जन्माची माहिती मिळतात त्याने थेट मुंबईची वाट धरत पत्नी आणि मुलीची भेट घेण्यासाठी धाव घेतली.