नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट सुरेश रैनाने नेदरलँडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर सुरेश रैनाने पंतप्रधान मोदी आणि आपल्या पत्नीसोबतचे फोटो स्वतः ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सुरेश रैनाने ट्विट करताना लिहिले की, ज्या व्यक्तीकडे गोल्डन व्हिजन आहे अशा नरेंद्र मोदी यांना नेदरलँडमध्ये भेटून खूप चांगले वाटले. 



या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रैनाचा हात हातात घेतला आहे. त्यांच्या डाव्याबाजूला रैनाची पत्नी प्रियंका चौधरी उभी आहे. 



सुरेश रैना सध्या टीममधून बाहेर असून सध्या पत्नीसोबत नेदरलँडमध्ये सुट्या घालवत आहे. 


रैनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी कमेंट करून सुरेश रैनाचे अभिनंदन केले आहे.