Yuvraj Singh SUV BMW X7: क्रिकेटर युवराज सिंगचे आपण सगळेच चाहते आहोत. आजपर्यंत त्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत. आजही अनेक बॉलीवूड हिरोप्रमाणे तोही तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. युवराजच्या घरी नुकत्याच एका लहान बाळाचे आगमनही झाले आहे पण आता युवराजच्या आयुष्यात आणखीन एकाची एन्ट्री झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीची फ्लॅगशिप SUV BMW X7 च्या टॉप व्हेरियंट कारची म्हणजेच xDrive40i M Sport ही गाडी खरेदी केली आहे. ही कार इंजिन ते स्पीडपासून सर्वाेत्तम अशी आहे. या कारचा टॉप स्पीड 245 KM प्रतितास आहे. 


BMW X7 ला लेझर लाइट्ससह हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्पसह 22-इंच अलॉय व्हील आणि इलेक्ट्रिक टेलगेट मिळतात. गाडीच्या आत इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आहे त्याशिवाय लेदर अपहोल्स्ट्री, पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारख्या सुविधा आहेत. 


या SUV ची किंमत 1.19 कोटी रुपये (ex-showroom price) आहे. युवराज सिंगने ही कार फायटोनिक ब्लू कलरमध्ये घेतली आहे, जी खूप लोकप्रिय आहे. युवराजकडे बीएमडब्ल्यूच्या F10 M5, E60 M5, F86 X6M आणि E46 M3 अशा गाड्या आहेत. 


काय आहे SUV BMW X7 xDrive40i M Sport ची खासियत? 
या BMW कारला 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 265 hp जास्तीत जास्त पॉवर आणि 620 Nm peak torque निर्माण करते तर 3.0-लिटर टर्बोचार्ज्डच्या डिझेल इंजिन ज्यात 340 hp ची पॉवर आहे जो 450 Nm चा peak torque जनरेट करते. यामध्ये 6/7 seater SUV आहे. 



पेट्रोल इंजिनचा टॉप स्पीड 245 KM प्रतितास आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे ही कार या इंजिनद्वारे 6.1 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पुर्ण करते. डिझेल इंजिनचा टॉप स्पीड 227 kmph आहे आणि जे 7 सेकंदात 100kmpb इतका वेग वाढवू शकते. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. विशेष बाब म्हणजे एसयूव्हीच्या चारही चाकांमध्ये पॉवर ट्रान्सफर आहे.