मुंबई : क्रिकेट खेळाडूंनी काहीही केलं तरी लोकं त्यांच्याबद्दल आणखी  जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या खेळा इतकेच लोकं त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात कोणाला भेटतात. कुठे फिरायला जाता हे सगळं जाणूंन घेण्यासाठी लोकांना फार आवडत असते. परंतु आपल्याला सगळ्याच क्रिकेटरच्या आयुष्यातील गोष्टी माहित नसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत, ज्यांना त्यांच्या पत्नीने फसवले आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांची पत्नी त्यांना आयुष्यात एकटं सोडून गेली आणि दुसरा संसार थाटला आहे


दिनेश कार्तिक



टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजाराशी असलेल्या त्याच्या संबंधाबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. वास्तविक निकिताने कार्तिकला घटस्फोट दिला आणि भारताचा सलामीवीर मुरली विजयशी लग्न केले.


पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दिनेश कार्तिकने देखील भारतीय स्क्वॉश प्लेयर दीपिका पल्लीकलशी लग्न केले. आता हे जोडपे एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत आणि एकमेकांसोबत सुखी संसार करत आहे.


तिलकरत्ने दिलशान



श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज तिलकरत्ने दिलशानची पत्नी निलंका विथनगे हिने देखील त्याला सोडले आणि दुसर्‍या क्रिकेटपटूशी लग्न केले. आश्चर्याची बाब म्हणजे दिलशानच्या पत्नीने श्रीलंका टीमच्या सलामीचा फलंदाज उपुल थरंगाशी (Upul Tharanga) लग्न केले आहे. उपुल आणि तिलकरत्ने दिलशान या दोन्हीही फलंदाजांनी मिळून बराच काळ श्रीलंकेसाठी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती.


ब्रेट ली



या यादीतील तिसरे नाव ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली आहे. सिडनी हेराल्डच्या वृत्तानुसार, ब्रेट लीला त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट दिला होता. कारण तिचे असे म्हणणे होते की, ब्रेट ली आपल्या खेळात जास्त व्यस्त असल्यामुळे तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. नंतर लीच्या पहिल्या पत्नीने एका प्रसिद्ध रग्बी प्लेयरशी लग्न केलं आहे.