मुंबई : क्रिकेट हा आपल्या भारतीयांचा आवडता खेळ झाला आहे. ज्याने बऱ्याच भारतींयाना वेड लावले आहे आणि यामागील कारण आहे क्रिक्रेट्स. क्रिकेटर्स ज्यापद्धतीने खेळ खेळतात, ते त्यांच्या चाहत्यांना वेडं करुन सोडतात. सध्या तर लोक जसे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी वेडे होते, तसे क्रिकेटर्ससाठी देखील वेडे झाले आहेत. ते काय करतात? कुठे जातात? त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे बऱ्याच लोकांना जाणून घेण्यात उत्सुकता असते. ज्यामुळे काही क्रिकेटर्स किंवा सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या मदतीने आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहाता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु अशा बऱ्याच गोष्टी सेलिब्रिटींच्या बाबतीत असतात, ज्या आपल्याला माहिती नसतात. तर आज आम्ही तुम्हाला क्रिकेट स्टार्सच्या सर्वात जवळील व्यक्ती म्हणजेच त्यांच्या मुलांबद्दल सांगणार आहोत.


बऱ्याचदा आपल्याला या क्रिकेटर आणि त्याच्या आयुष्याबद्दल अप्रुप वाटते. तसेच त्यांच्या घरचे किंवा त्यांची मुलं कसं आयुष्य जगत असतील? ते आयुष्यात काय करत असतील. असा प्रश्न पडतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटर्सच्या मुलांबद्दल सांगणार आहोत.


अरुणी कुंबळे- अनिल कुंबळेच्या मोठ्या मुलीचे नाव अरुणी कुंबळे आहे. अरुणीने बंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. इंपीरियल कॉलेज, लंडनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए आहे.


स्वस्ती कुंबळे- स्वस्ती कुंबळे ही माजी भारतीय क्रिकेटर आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची धाकटी मुलगी आहे. स्वस्ती शाळेत आहे आणि ती एक स्टोरी टेलर देखील आहे.


सना गांगुली- सना गांगुली ही भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी आहे. सना सध्या लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे.


अमिया देव- अमिया देव ही माजी भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची मुलगी आहे. अमियाने आपले शालेय शिक्षण मौलसरी, गुडगाव येथील श्री राम स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने यूकेच्या सेंट अँड्र्यूज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. अमियाने तिच्या वडिलांची बायोग्राफी असलेल्या 83 सिनेमामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.


समित द्रविड- राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सध्या शाळेत आहे. वडिलांप्रमाणेच त्याला क्रिकेटर बनण्याची इच्छा आहे. समितने 14 वर्षांखालील स्तरावर क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि तो आपल्या खेळावर खूप मेहनत घेत आहे.


सारा तेंडुलकर- सारा तेंडुलकरबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही, ती महान खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी आहे. साराने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. सारा छंद म्हणून मॉडेलिंगही करते आणि हल्लीच तिने एका ऍडद्वारे मॉडलिंगमध्ये पाऊल ठेवलं आहे.