नवी दिल्ली : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्यांदा पिता बनला आहे. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रॉड्रिग्जने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या मुलीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रोनाल्डो ट्विटरवर लिहिलं आहे की, अलाना मार्टिनाचा आताच जन्म झाला आहे. जियो आणि अलाना दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. आम्ही सर्व खूपच आनंदी आहोत".


रोनाल्डो जुळ्या मुलांचा इवा आणि मातेओ यांचाही पिता आहे. या जुळ्या मुलांचा जन्म जून महिन्यातच झाला होता.


ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली पत्नी जार्जिना आणि सात वर्षांचा मुलगा क्रिस्टियानो ज्युनिअरचा फोटो अपलोड केला आहे.



रोनाल्डोचा एक मुलगा ७ वर्षांचा आहे. पोर्तुगालच्या युरो २०१६ विजेता टीमचा कॅप्टन रोनाल्डो जून २०१० मध्ये क्रिस्टियानो ज्युनिअरचा पिता बनला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मोठा मुलगा सरोगेसीद्वारे जन्मला आहे. मात्र, या संदर्भात रोनाल्डोने अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.