युरोप (बुडापेस्ट) : गेल्या दीड दशकापासून फुटबॉल विश्वात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नाव कमावलेल्या आणि अनेक विक्रमांना मोडलेल्या खेळाडूंबद्दल बोलयचे झाले, तर सगळ्यांच्याच तोंडात पहिलं नाव येतं ते पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo). याचे पोर्तुगालच काय तर संपूर्ण जगाला नाव माहित आहे, ज्यामुळे अनेक स्पोट्स कंपन्या आणि इतरही, कंपन्या त्याच्या सोबत आपले ब्रँड प्रमोट करतात. ज्यासाठी रोनाल्डोला मोठी रक्कम देखील दिली जाते. परंतु हल्लीच रोनाल्डोने  एका मोठ्या कंपनीला मोठा धक्का दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या युरो कप 2020 (UEFA Euro 2020) स्पर्धा युरोपमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पोर्तुगालच्या कर्णधाराने सगळ्यात जास्त वेळा युरो चषकात खेळण्याचा विक्रम मोडला.


परंतु त्यापूर्वी रोनाल्डोने जगातील सगळ्यात मोठी सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोलाला कोट्यावधी रुपयांचा झटका दिला आहे. यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) कोणताही करार मोडला नाही किंवा कंपनीची फसवणूक देखील केली नाही. परंतु रोनाल्डोने फक्त कोका-कोलाच्या दोन बाटल्या स्वत: पासून थोड्या लांब सरकावल्या, ज्यामुळे हे सगळं घडलं आहे.


मंगळवारी 15 जून रोजी युरो चषकात हंगेरीविरुद्धच्या ग्रुप एफमधील पोर्तुगालच्या पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी, बुडापेस्टमधील स्टेडियमवर पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सोमवारी पत्रकार परिषद घेतली.


पत्रकार परिषदेसाठी रोनाल्डो येऊन खुर्चीवर बसला आणि त्याचक्षणी त्याच्या समोर टेबलावर ठेवलेल्या सॉफ्ट ड्रिंक कोका-कोलाच्या दोन बाटल्या त्याने उचलून स्वत: पासून दूर 2-3 फूट लांब ठेवले आणि मग त्याने आपल्याबरोबर आणलेली पाण्याची बाटली टेबलावर ठेवली.


जगातील तंदुरुस्त खेळाडूंपैकी रोनाल्डो एक आहे आणि अशा खेळाडूच्या या छोट्याशा कृत्याने असे सूचित केले  की, तो कोणत्याही प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंकचे समर्थन तो करत नाही, कारण ते आरोग्यासाठी चांगले नसते. साहजिकच, जगातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या कोका-कोलाला रोनाल्डोच्या या छोट्याशा कृत्याने शेअर बाजारातील किंमतीवर परिणाम झाला.



डेली स्टारच्या अहवालानुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जेव्हा युरोपमध्ये शेअर बाजार सुरू झाला, तेव्हा कोका-कोलाच्या शेअरची किंमत 56.10 अमेरिकन डॉलर्स होती. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर रोनाल्डोचा व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीचे शेअर खाली आले. ज्यामुळे कोका कोलाचा शेअर 55.22 डॉलरवर घसरला.


म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.6 टक्क्यांनी घसरली आणि कोका-कोलाच्या किंमतीत सुमारे 4 अब्ज डॉलर म्हणजेच 293.43 कोटी रुपयांची घट झाली. कंपनीची एकूण किंमत 242 अब्ज डॉलर्सवरून घसरून 238 अब्ज डॉलरवर पोहचली आहे.