FIFA World Cup Qatar 2022: सर्वांची प्रतिक्षा असलेला फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2022) येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये (FIFA 22 Qatar) खेळवला जात असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. 32 टीमचे थरारक सामने पहायला मिळणार असल्याने सर्वच संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. अशातच आता स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Cristiano Ronaldo?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुर्तगालचा दिग्गज फुटबॉलर आणि सहा वेळा बैलन डिओर पुरस्कार विजेता रोनाल्डोने मोठं वक्तव्य केलंय. आम्हाला अंतिम फेरी गाठायची असेल तर पहिल्या सहा सामन्यांमध्ये आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. सर्व प्रथम, आम्ही बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न करू. आम्ही कतारमध्ये लढण्यास तयार आहोत, असं रोनाल्डो म्हणाला.


प्रत्येक सामना हा संघर्ष असतो आणि टिकण्यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं आवश्यक आहे, असा सल्ला देखील त्याने सहकार्यांना दिला आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पोर्तुगालच्या एच गटामध्ये उरुग्वे, घाना आणि दक्षिण कोरिया संघ आहेत.


आणखी वाचा  - FIFA World Cup 2022: अर्जेंटिनासाठी वाईट बातमी, मेस्सीचे दोन स्टार खेळाडू फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर!


FIFA विश्वचषक 2018 च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये उरुग्वेने पोर्तुगालला घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आता यंदा जगात नावाजलेला फिफा वर्ल्ड कप जिंकून पुन्हा स्वत:ला अव्वल सिद्ध करण्याची तयारी रोनाल्डो आणि टीम करत आहे. पोर्तुगाल 24 नोव्हेंबर रोजी घाना विरुद्ध 2022 च्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करेल.