क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डोने गोल करून इतिहास रचला.
Cristiano Ronaldo 900 Goals Record : फुटबॉलच्या नेशन लीगला सुरुवात झाली असून 5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगाल विरुद्ध क्रोएशिया असा फुटबॉल सामना पार पडला. या सामन्यात पुर्तगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डो याचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांची टीम सुरुवातीपासून 1-0 ने पुढे होती, तेव्हा 34 व्या मिनिटांत त्यांनी अजून एक गोल करून स्कोअर मजबूत केला. रोनाल्डोने हा एक गोल करून फुटबॉलमध्ये इतिहास रचला. क्लब आणि आपल्या देशासाठी खेळत असताना त्याने आपल्या करिअरमधील 900 गोल केले. अशी कामगिरी करणारे तो एकमेव खेळाडू बनला आहे.
900 वा गोल केल्यावर रोनाल्डो काय म्हणाला?
क्लब आणि आपल्या देशासाठी खेळताना रोनाल्डोने ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला. हा रेकॉर्ड केल्यावर सोशल मीडियावर आपल्या फुटबॉल कारकिर्दीचा छोटा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना रोनाल्डोने फॅन्सचे आभार मानले. त्याने म्हंटले की, खूप वर्षांपासून त्याने हे स्वप्न पाहिलं होतं जे आता पूर्ण झालंय. आता काही अजून स्वप्न पूर्ण व्हायची बाकी आहेत. तर असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हंटले की तो खूप दिवसांपासून हा रेकॉर्ड होण्याची प्रतीक्षा करत होता. त्याला पूर्ण विश्वास होता की तो हे ध्येय पूर्ण करेल. माझ्या आयुष्यातील हा माइलस्टोन खूप इमोशनल आहे.
हेही वाचा : ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू
जगातील सर्वात जास्त गोल करण्याचा रेकॉर्ड :
फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेसी हा हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. गोल करण्यात दोघेही खेळाडू एकमेकांना टक्कर देतात. 39 वर्षांचा रोनाल्डो हा आता गोल करण्याच्या बाबतीत मेसीपेक्षा पुढे गेला आहे. फुटबॉलच्या इतिहासात रोनाल्डोने 900 तर मेस्सीने 838 गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि क्लब करिअरमध्ये तो 900 गोल सह टॉपवर आहे. तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 131 गोल केले असून तेथे सुद्धा तो टॉपवर आहे.
2002 मध्ये रोनाल्डोच्या करिअरची सुरुवात :
जगप्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या करिअरची सुरुवात 2002 मध्ये केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने रियल मेडरिडसाठी 458, मँचेस्टर युनाइटेडसाठी 145, जुवेंटससाठी 101 आणि नस्सरसाठी 68 गोल केले आहेत. तर त्याने 5 गोल स्पोर्टिंग लिस्बनसाठी केले आहेत.