Ugandan Olympian Rebecca Cheptegei Death : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यात अनेक देशांच्या खेळाडूंनी सहभागी होत पदकांची लयलूट केली. मात्र आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या एका महिला खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका रिपोर्टनुसार युगांडाची धावपटू रेबेका चेप्टेगी हिच्यावर बॉयफ्रेंडने अतिशय वाईट पद्धतीने हमला केला आणि मग तिला जाळले. यात रेबेका गंभीरीत्या जखमी झाली, त्यामुळेच तिचा मृत्यू देखील झाला. युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याविषयी माहिती दिली असून रेबेका सध्या एंडेबेसमध्ये राहून ट्रेनिंग घेत होती. रेबेकाच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
'द गार्जियन' च्या एका रिपोर्टनुसार रेबेकाच्या बॉयफ्रेंडने तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. ही घटना रविवारी केन्यामध्ये घडली, रेबेका ही केवळ 33 वर्षांची होती. या दुर्घटनेत रेबेकाच्या शरीराचा 75 टक्के भाग जळाला होता, रेबेकापूर्वी दोन महिला खेळाडूची सुद्धा हत्या झाली आहे. केन्या ऑक्टोबर 2021 रोजी तीन महिला खेळाडूंची हत्या झाली होती.
रेबेकाने यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभाग घेतला होता. यात ती 44 व्या क्रमांकावर राहिली. रेबेकाची हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख डिक्सन नदीमा अशी सांगण्यात येत आहे. तो सुद्धा लावलेल्या आगीमुळे जखमी झाला. रिपोर्टनुसार रेबेका आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये जमिनीवरून वाद सुरु होता. या घटनेनंतर रेबेकाचं कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केलीये तर रेबेकाच्या मृत्यूवर एथलेटिक्स महासंघाने देखील दुःख व्यक्त केले.
हेही वाचा : Duleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी
रेबेकाच्या पूर्वी दोन महिला खेळाडूंची हत्या झालेली आहे. एग्नेस टिरोपा आणि डामारिस मुटुआची हत्या झालेल्या खेळाडूंची नावे असून या प्रकरणात पोलिसांनी तिच्या जवळील व्यक्तींना जबाबदार ठरवले आहे. टिरोपाच्या नवऱ्यावर तिच्या हत्येचा आरोप आहे. तर मुटुआच्या हत्येप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडवर पोलिसांना संशय असून ते त्याचा तपास करत आहेत.