Crocodile kills Costa Rican footballer: कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. यावेळी स्थानिकांनी कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद केली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या मगरीचा पाठलाग करत तिला ठार केलं आणि मृतदेह मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्शीय अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने ब्रीजवरुन नदीत उडी मारली होती. नदीत मगरींचा वावर असल्याने ही नदी मासेमारीसाठी बंद ठेवण्यात आली होती. पण यानंतरही जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजने धाडस केलं. पण त्यात त्याला जीव गमवावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कोस्टा रिकाच्या गुआनाकास्ट प्रांतातील रियो कैनास नदीत हा सगळा थरार घडला आहे. 


 


मगरीला गोळी घातली


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजचा मृतदेह मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी मगरीला गोळी घातली. याचं कारण जर मगरीला बाहेर पाण्यात असतानाच ठार केलं नसतं तर तिने मृतदेह अशा ठिकाणी लपवला असता, जिथे शोध घेणं पोलिसांना फार कठीण पडलं असतं. 



सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल


या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत एका महाकाय मगरीने तोंडात जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजचा मृतदेह पकडल्याचं दिसत आहे. यावेळी ती मृतदेह घेऊन नदीत पोहत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडीओ स्थानिक मगरीवर गोळीबार करताना दिसत आहे, जेणेकरुन मृतदेह हाती लागावा. 


फुटबॉलपटूच्या कुटुंबाने मागितली मदत


जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजला चूचो या नावानेही ओळखलं जात होतं. तो डेपोर्टिवो रियो कैनास संघाचा फुटबॉलपटू होता. तसंच त्याच्या मागे दोन मुलीही आहेत. त्यांचं वय 8 आणि 3 आहे. दरम्यान, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा खर्च मिळाला यासाठी लोकांकडे मदत मागितली आहे. 


फुटबॉलपटूच्या क्लबकडून श्रद्धांजली


जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजच्या टीमचे मॅनेजर लुइस कार्लोस मोंटेस लोपेज कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी श्रद्धांजली देताना म्हटलं आहे की, "अत्यंत दु:खाने आम्ही आमचा खेळाडू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करत आहोत. आम्ही कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत".