ICC T20 world cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना सुरू होण्याआधीच चाहत्यांमधील उत्सूकता वाढली आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मेलबर्न स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. BCCI ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विराट कोहली नेटवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये कोहलीशिवाय हार्दिक पांड्या, आर अश्विन आणि ऋषभ पंतही नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सर्वजण एकजुटीने 'जीतेगा भाई जीतेगा इंडिया'चा नारा देत आहेत यावरून चाहत्यांच्या उत्साहाचा अंदाज लावता येतो.



ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यातून दोन्ही संघ स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे.