मुंबई: विराट कोहलीने खास कॅप्टन कूल धोनीसाठी दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता अफगाणिस्तानचे स्टार गोलंदाज राशीद खानने कॅप्टन कूलबद्दलच्या आपल्या भावना एका शब्दात व्यक्त केल्या आहेत. राशीदनं दिलेल्या उत्तरानं युझर्सची मनं जिंकली आहेत. राशीचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशीद खानने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं होतं. एका चाहत्याने महेंद्रसिंह धोनीसंदर्भात राशीदला प्रश्न विचारला. टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या धोनीबद्दल एका शब्दात सांग असा प्रश्न होता. 


या प्रश्नातं उत्तर फारच देत राशीद खान म्हणाला की एमएस धोनीसाठी एक शब्द पुरेसा नाही. पण तरीही याचं उत्तर देताना राशीदने किंग म्हणजे राजा असं उत्तर दिलं आहे. महेंद्रसिंह धोनी किंग म्हटलं आहे. 


या आधी चाहत्यांनी विराट कोहलीला धोनी आणि त्याच्या बॉन्डिंगबद्दल अवघ्या दोन शब्दांत सांगायला सांगितले होते. यावर विराटने विश्वास आणि आदर असे दोन शब्द धोनीसाठी लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 


IPL 2021 उर्वरित 31 सामन्यांमध्ये राशीद खान असणार का या प्रश्नावर देखील त्याने उत्तर दिलं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना IPL 2021च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


बॉलिवूड केव्हा जॉइन करणार असा एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. त्यावर राशीद खानने लवकरच असा रिप्लाय दिला आहे. राशीदने एका शब्दात कॅप्टन कूलला किंग अशी भावना व्यक्त केली आहे.