मुंबई : बंगळुरु विरुद्ध चेन्नई अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर धोनी टीममधील खेळाडूंवर संतापल्याचं पाहायला मिळाला. आता सगळ्यांना उत्सुकता ही आहे की चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई टीमचं कर्णधारपद जडेजानं सोडलं आणि पुन्हा धोनीकडे सोपवलं आहे. त्यानंतर एका सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला. टीमने आतापर्यंत झालेल्या 10 पैकी 7 सामने गमवले आहेत. तर 3 सामने जिंकले आहेत. प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी 16 गुणांची आवश्यकता होती. 


चेन्नईनं हा सामना गमवल्याने आता प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. प्लेऑफच्या स्पर्धेतून चेन्नई टीम आऊट झाली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. 


समजा जर चेन्नई पुढे 4 ही सामने जिंकली आणि रनरेटही त्यांना चांगला ठेवता आला तर त्यांच्याकडे 14 पॉईंट होतात. बाकी टीमना 10, 12, 14 आणि 16 गुण आहेत. त्यामुळे चेन्नईला हे कठीण जाणार आहे. 


पॉईंट टेबलवर आमचे मार्क चांगले नाहीत कुठे चुकलं ते शोधून त्यावर काम करण्याची गरज असल्याचं महेंद्रसिंह धोनीनं म्हटलं आहे. प्लेऑफमधून बाहेर गेल्याची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या तिथे आहेत.