N Srinivasan benefited in crores : आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघावर बक्षिसाचा वर्षाव झालाय. त्याआधीच मालक एन श्रीनिवासन यांना कोटींचा फायदा झाला आहे. एन श्रीनिवासन यांचे क्रिकेटशी जुने नात आहे. बीसीसीआय चीफ म्हणून त्यांनी काम केले आहे. ते आयसीसीचे माजी चेयरमन सुद्धा होते. अनेक वादही त्यांच्याशी जोडले आहेत. ते CSK चे मालक असले तरी त्यांची इंडिया सिमेंट ही कंपनी आहे. देशाच्या सिमेंट उद्योगात इंडिया सिमेंटच मोठे नाव आहे. देशातील पाच टॉप सिमेंट कंपनीपैकी इंडिया सिमेंट आहे. देशाच्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये इंडिया सिमेंटचा 5 ते 7 टक्के मार्केट हिस्सा आहे.  वर्ष 2008 मध्ये त्यांनी CSK ची टीम विकत घेतली.


सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल सोमवारी एन श्रीनिवासन यांच्या सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. या कंपनीचा शेअर 193.20 रुपयावर बंद झाला. बाजार चालू असताना इंडिया सिमेंटचा शेअर 193.50 रुपयापर्यंतही पोहोचला होता. सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजी असण्याचा आज दुसरा दिवस होता. शुक्रवारी कंपनीचा शेअर 187.85 रुपयावर बंद झाला होता. इंडिया सिमेंटचे 52 आठवड्यातील 298.45 रुपयां तेजी दिसली. 20 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसली होती.



इंडिया सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजी असल्याने कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून आली. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला, तेव्हा कंपनीच मार्केट कॅप 5,821.41 कोटी रुपये होते. सोमवारी शेअर बाजार बंद होताना कंपनीच मार्केट कॅप वाढून ते 5,987.21 कोटी रुपये झाले. म्हणजेच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये एकाच दिवसात 166 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स चॅम्पियन बनण्याआधी कंपनीच्या मालकाचा 166 कोटी रुपयांचा फायदा झाला.


अंतिम सामना जिंकताच चेन्नई सुपर किंग्स श्रीमंत 


IPL 2023 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम  देण्यात आली. जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये ही सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 6.5 कोटी देण्यात आले.


जगभरात खेळल्या जाणार्‍या वेगवेगळ्या T20 लीगमध्ये इतकी बक्षीस रक्कम दिली जात नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) नंतर SA20 लीगमध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कम दिली जाते. दक्षिण आफ्रिका T20 लीग जिंकणाऱ्या संघाला 15 कोटी रुपये दिले जातात. त्याचवेळी, कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 8.14 कोटी रुपये दिले जातात. याशिवाय पाकिस्तान सुपर लीगमधील ही रक्कम केवळ 3.40 कोटी रुपये आहे.