CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? `रिझर्व डे` बाबत अधिकृत माहिती समोर!
Reserve day for IPL 2023 final : जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.
CSK vs GT Final: आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम मॅचआधी अहमदाबादमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) यांच्यात आयपीएलचा फायनल (IPL 2023 Final) सामना खेळवला जात आहे. मात्र, सामन्याआधी जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. जर आज सामना झाला नाही तर काय होणार? यावर आता अधिकृत माहिती समोर आली आहे.
रिझर्व डे आहे की नाही?
जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ, उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.
साधारण 12.50 पर्यंतचं वेळ असतो. पाऊस थांबला तर किमान 5-5 ओव्हरचा खेळ होईल. त्यावेळेपर्यंत सामना जर सुरू झाला नाही तर रिझर्व डे असणार आहे, अशी माहिती मराठी समालोचक चैतन्य संत यांनी झी 24 ताससोबत बोलताना दिली.
अंबाती रायडूची निवृत्ती
चेन्नई संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने मोठी घोषणा केली आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. आता कोणताही यू टर्न नाही, असं अंबाती रायडू म्हणाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग XI
ऋतुराज गायकवाड,डेवोन कॉन्वे, शिवम दुबे/मतीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश तीक्ष्णा.
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग XI :
शुभमन गिल/जोशुआ लिटिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेविड मिलर, राशिद खान, राहुल तेवतिया, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी.