मुंबई : मेगा ऑक्शनसाठी कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान ऐवजी त्याचा मुलगा आर्यन खान दिसला होता. आता आयपीएलच्या पहिला सामन्यातही आर्यन खान प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये दिसला. वानखेडे स्टेडियमवर यावेळी आर्यन खानसोबत एक मिस्ट्री गर्ल देखील दिसली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानसोबत मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोलकाताच्या सामन्या दरम्यान या अप्सरेनं चाहत्यांची मन घायाळ तर केलीच पण सोशल मीडियावर तिची चर्चाही जोरदार रंगली आहे. ही मिस्ट्री गर्ल आर्यन खानसोबत मॅच पाहण्यासाठी आल्याची चर्चा आहे. 


आर्यनसोबत दिसली सौंदर्यवती
कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान आपल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्या आर्यन खान कोलकाता संघासोबत सगळीकडे जात असल्याचं दिसत आहे. टीमचं मनोबल वाढवण्यासाठी आर्यन खान वानखेडे स्टेडियमवर पोहोचला होता. त्याच्या शेजारी एक सुंदर तरुणी बसल्याचं दिसत आहे. 


आर्यन खान वानखेडे स्टेडियमवर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सामना पाहण्यासाठी गेला होता. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघाला विजय मिळवण्यात यश आलं. 


या मिस्ट्री गर्लला पाहताच युजर्स कोलकाताचा विजय आणि श्रेयस अय्यरला शुभेच्छा द्यायच्याही विसरून गेले. ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? ती आर्यन खानसोबत दिसल्याने आता युजर्सची उत्सुकताही वाढली आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.