मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नईची सुरुवात खूप वाईट झाली. सलग तीन सामने चेन्नईला हार स्वीकारावी लागली. पहिल्यांदाच हे असं घडलं असावं की चेन्नईला पहिल्यांदा एकाही सामन्यात यश मिळालं नाही. चेन्नईची कमान धोनीनं जडेजाकडे दिली. जडेजाच्या नेतृत्वामध्ये चेन्नईला एकही सामना जिंकता आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब किंग्जने चेन्नईचा 54 धावांनी पराभव केला. या सामन्यात धोनीचा एकट्याचा जलवा पाहायला मिळाला. पंजाबच्या पहिल्या डावात त्याने रनआऊट केलं. तेव्हा धोनी हिरो बनला होता. भानुकाला रनआऊट केल्यानंतर तो हिरो बनला. 


फलंदाजीमध्ये धोनी स्लो खेळताना दिसला. त्याचा फटका चेन्नईला बसला असावा का अशीही एक चर्चा आहे. धोनीने 28 बॉलमध्ये 23 धावा केल्या. त्याच्या स्लो खेळण्यामुळे चेन्नईकडे कमी धावसंख्या झाली असंही म्हटलं जात आहे. 


चेन्नईनं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पंजाबने चेन्नईसमोर 181 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे टार्गेट चेन्नईला सहज गाठता आलं असतं मात्र फलंदाजांच्या फळीचं मनोबल खचल्यानं ते होऊ शकलं नाही.


टीमला सांभाळण्याच्या दृष्टीनं धोनीनं स्लो खेळी खेळली. पहिल्या 10 धावा करण्यासाठी त्याने 20 बॉल घालवले. या धीम्या गतीनं खेळण्याचा परिणाम असा झाला की आवश्यक तेवढा दबाव वाढला नाही. चेन्नईला शेवटच्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 60 धावांची गरज होती. 


CSKला एका ओव्हरमागे 20 धावांची गरज होती. अशा स्थितीत धोनी गेमचेंजर ठरू शकला असता. मात्र धोनी आऊट झाल्याने नाराशा झाली. चेन्नई टीमचा डाव 126 धावांवर आटोपला.