IPL 2022 Retention : चेन्नई सुपरकिंग्स संघ अनेकांसाठी ऑलटाईम फेव्हरेट संघ राहिला आहे. धोनी कर्णधार असलेल्या या संघाने मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या 4 खेळाडूंना संघात रिटेन केले आहे. पण संघाला आणखी 5 जणांना संघात घ्यायचे आहे. टीमने रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोइन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन केल्यानंतर आता संघ या 5 खेळाडूंसाठी कितीही पैसा मोजाय़ला तयार आहे.


मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्स पहिल्यांदा मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला संघात घेण्याचा प्रयत्न करेल. चेन्नई सुपरकिंग्सच्या यशात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. संघात त्याची जागा ही मोठी आहे. त्यामुळे संघ त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजू शकते.


ओपनर फाफ डुप्लेसीला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स मोठा दाव लावू शकते. त्याने आपल्या कामगिरीने मन जिंकलंच आहे. डुप्लेसीच्या चांगल्या खेळीच्या जोरावर संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्याने 16 सामन्यामध्ये 633 रन केलेत. ज्यामध्ये 6 अर्धशतकांचा ही समावेश आहे. डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड संघासाठी ओपनिंग करु शकतात.


ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं असलं तरी देखील तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्याची जागा चेन्नई संघात मोठी राहिली आहे. ब्रावोने 2021 च्या सीजनमध्ये 11 सामन्यात 14 विकेट घेतलेत. डेथ ओव्हरमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तो चांगला हिटर आहे. त्याची ऑलराऊंडर कामगिरी संघाला मोठा फायदा करुन देते.


दीपक चाहरला देखील चेन्नई संघात घेतलं जावू शकतं. चाहर आपल्या स्विंगसाठी ओळखला जातो. चाहर 2016 पासून चेन्नई सुपरकिंग्स सोबत खेळण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये त्याने 17 सामन्यात 22 विकेट घेतले. मागच्या सीजनमध्ये तो जगा महागडा ठरला. पण त्याने 14 विकेट घेतले होते.


रॉबिन उथप्पा आणखी एक असं नाव आहे. ज्याच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स पुन्हा संघात घेऊ इच्छित असेल. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स सोबत जुडलेला उथप्पा मागच्या सीजनमध्ये फक्त 4 सामने खेळू शकला. क्वालिफायर 1 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरोधात त्याने 44 बॉलमध्ये 62 रन केले होते. त्यामुळे मिडिल ऑर्डरमध्ये तो चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो.