गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण पदकाची लयलूट, नेमबाज संजीव राजपूतने मिळवले सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याआधी सुरुवातीला सुपर मॉम मेरी कोमने बॉक्सिंगचा गोल्डन पंच लगावला होता. संजीव रजपूतने ५० मीटर रायफल्स थ्री पोझिशन्समध्ये सुवर्ण कमाई केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण लयलूट सुरुच आहे. ५२ किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंखी याला सुवर्ण पदक, तर अमित पानघळ यांने ४६-४९ वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केलीआहे. 


संजीव रजपूतचा गोल्ड निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रकुल स्पर्धेतील आजच्या दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये ४५-४८ किलो वजनी गटात मेरी कोमने सुवर्ण पदक पटकावले. तर, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला कुस्तीमध्ये विनेश फोगटने विजय मिळवला. त्यामुळे पदकांच्या आशा अजून कायम आहेत. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारत पदकतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यास सज दिसत आहे.


मेरी कोमला सुवर्णपदक



पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या मेरी कोमकडे राष्ट्रकुल स्पर्धेचे एकही पदक नव्हते. पण आज मेरी कोमने सुवर्णपदक तिच्या नावे केले आहे आणि भारताच्या खात्यात सुवर्ण पदक टाकले. मेरी कोम व क्रिस्टिना ओहारा या दोघींमध्ये अंतिम व निर्णायक सामन्यात एकूण पाच फेऱ्या झाल्यात. मेरी कोमने प्रत्येक फेरीत वर्चस्व कायम राखलं आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मेरी कोमने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर ५-० ने मात करत आपल्या नावावर सुवर्ण पदक केले.


नेमबाज संजीव राजपूतला सुवर्ण


राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण पदकाची लयलूट, नेमबाज संजीव राजपूतने मिळवले सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याआधी सुरुवातीला सुपर मॉम मेरी कोमने बॉक्सिंगचा गोल्डन पंच लगावला होता. संजीव रजपूतने ५० मीटर रायफल्स थ्री पोझिशन्समध्ये सुवर्ण कमाई केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण लयलूट सुरुचआहे. ५२ किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंखी याला सुवर्ण पदक, तर अमित पानघळ यांने ४६-४९ वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केलीआहे.