ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 5 सुवर्ण पदके मिळली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक पटकावलंय. 
 
 पूनम यादव वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलंय. 69 किलो वजनी गटात पूनमने ही सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीय. अंतिम फेरीमध्ये इंग्लंडच्या सारा डेविसने 128 किलोग्रामचे वजन उचलण्याचा प्रयत्न केला, परंतू तो असफल झाल्याने पूनमच्या पारड्यात सुवर्णपदक पडले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पूनमचे अभिनंदन केलंय. पूनमच्या या सुवर्णपदकामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत पाच सुवर्णपदकांची कमाई केलीय.


 


 



राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये पाचपैकी तीन सुवर्णपदके ही महिलांनी जिंकली आहेत.