CWG 2022 : बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात पदकांची भर पडत आहे. अचंता शरत कमलने (achanta sharath kamal) कॉमनवेल्थमध्ये टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. याआधी टेबल टेनिसमध्ये दुहेरी स्पर्धेत अचंताने श्रीजा अकुलासोबत खेळतानाही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अचंताने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे बॅटमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या (Satwik Sai Raj Rankireddy and Chirag Shetty) जोडीने सुवर्णपदक मिळवले आहे. सात्विक आणि चिरागच्या या पदकाने भारताला बॅटमिंटन स्पर्धेच एकाच दिवशी तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.



टेबल टेनिस स्पर्धेत कांस्पपदकही भारतीय खेळाडूनेच जिंकले आहे. अचंताचा सहकारी ज्ञानेश्वरने हे पदक जिंकले. ४० वर्षीय अचंताने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या खेळाडूला नमवत सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे. पहिला गेम नमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. 


दरम्यान, भारताची बॅटमिंटन स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही वेळातच लक्ष्य सेन यानेही सुवर्णपदक मिळवले.


लक्ष्य सेनने पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेमध्ये जोरदार पुनरागमन केले. लक्ष्यने त्जे यंगला १९-२१.२१-९,२१-१६ अशा फरकाने हरवलं आणि सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे हे विसावे सुवर्णपदक आहे. तर बॅटमिंटनमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे