Commonwealth Games 2022: महिला लॉन बॉल संघाने बर्मिंगहॅम येथे 22 व्या कॉमनवेल्थ स्पर्धेत इतिहास रचला. लॉन बॉलमध्ये भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाचा 17-10 असा पराभव करून भारतीय संघाने सुवर्ण पदक नावावर केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की यांच्या टीमने सुवर्णपदक जिंकले. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच लॉन बॉलमध्ये भाग घेतला होता.  22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आता एकूण 10 पदके आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमनवेल्थ गेम्सच्या 92 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल महिला संघाने पदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉल 1930 च्या सुरुवातीपासून खेळला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, त्याने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत कधीच लॉन बॉलमध्ये पदक जिंकले नव्हते. पण आता इतिहासात प्रथमच भारताला या खेळात पदक मिळाले आहे.  या स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.



 


न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर होता. न्यूझीलंड संघाने लॉन बॉलमध्ये आतापर्यंत 40 पदके जिंकली आहेत. भारतीय संघाने न्यूझीलंडचा 16-13 असा पराभव करून प्रथमच कॉमनवेल्थ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.