CWG 2022 Women Hockey Team: कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरु आहेत. आजही खेळाडूंनी चांगली कामगिरी भारताच्या पदरात पदकांची भर घातली. भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. 16 वर्षानंतर भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक पटकावलं आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने 2006 मध्ये सिल्व्हर पदक पटकावलं होतं. त्यानंतर आता ब्रॉंझ मेडल पटकावलं आहे. न्यूझीलंडला पेनल्टी शूटआउटमध्ये 2-1 ने पराभूत केलं आणि ब्रॉन्झ मेडल आपल्या नावावर केलं. या विजयानंतर भारतीय महिला संघाने एकच जल्लोष केला. महिला संघाने बॉलिवूड गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भारतीय महिला हॉकी संघ ठेका धरत आनंद साजरा करत आहे. भारतीय महिला हॉकी संघ 1997 च्या दस चित्रपटातील 'सुनो गौर से दुनियावालो' गाण्यावर नाचताना दिसत आहे.



महिला हॉकी संघ


भारत आणि न्यूझीलंड या संघात अतिटीचा सामना झाला. शेवटच्या डावापर्यंत भारताची न्यूझीलंड 1-0 ने आघाडी होती. पण शेवटच्या क्षणी 30 सेकंद उरली असताना न्यूझीलंड संघाला पेनल्टी मिळाली. ऑलिव्हिया मेरीने पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये केलं आणि  न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर सामना शूटआऊटमध्ये बरोबरीत सुटला. या सामन्यात भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करत न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला.