Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल मीडियावरुन #AskSRK या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांशी गप्पा मारतो. चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शाहरुख देतो. बुधवारी अशाच एका चर्चेमध्ये शाहरुख खानने एका भारतीय क्रिकेटपटूचा उल्लेख चक्क जावयाप्रमाणे आहे तो आमच्या असा केला. सध्या शाहरुखची ही कमेंट चांगलीच चर्चेत आहे. 


शाहरुखला नक्की काय विचारण्यात आलेलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाच्या गोलंदाजीची पिसं ऑस्ट्रेलियन फलंदाज काढत असतानाच दुसरीकडे शाहरुख मात्र त्याच्या चाहत्यांबरोबर याच वेळात गप्पा मारत होता. त्यावेळी एका चाहत्याने #AskSRK हा हॅशटॅघ वापरुन, "सर, विराट कोहलीबद्दल बोला काहीतरी. दर दिवशी आम्ही चाहत्यांमध्ये यावरुन वाद सुरु असल्याचं पाहतो. कोहलीबद्दल जरा जवान स्टाइलमध्ये काहीतरी बोला ना" अशी मागणी केली. विशेष म्हणजे शाहरुखने यावर प्रतिक्रियाही दिली.


नक्की वाचा >> 'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण


शाहरुख काय म्हणाला?


"माझं विराट कोहलीवर फार प्रेम आहे. तो माझा स्वत:चा खास जवळचा व्यक्ती असल्यासारखं वाटतं. त्याच्या भल्यासाठी मी कायमच प्रार्थना करतो. भावा, तो आमच्या जावयासारखा आहे," असं शाहरुखने या पोस्टला रिप्लाय करताना म्हटलं आहे. 



वयाचं अंतर किती?


शाहरुखने विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर अनेकदा काम केलं आहे. 'रबने बना दी जोडी', 'जब तक हैं जान', 'जब हॅरी मीट सेजल', 'झीरो', 'ए दिल है मुश्कील' यासारख्या चित्रपटांमध्ये शाहरुख आणि अनुष्काने एकत्र काम केलं आहे. शाहरुख हा 57 वर्षांचा आहे. तर अनुष्का शर्मा ही 35 वर्षांची आहे. शाहरुखची जोडीदार म्हणून अनुष्काने चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती तेव्हा या दोघांच्या वयातील अंतर चर्चेचा मुद्दा ठरला होता. विराट कोहली हा 34 वर्षांचा आहे. 



शाहरुखने त्याच्याबरोबर केलाय डान्स


विराट आणि शाहरुखही अनेकदा एकमेकांना कार्यक्रमांमध्ये तसेच इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांमध्ये भेटले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये एका सामन्यानंतर शाहरुख आणि विराट भेटले होते तेव्हा या दोघांनी झुमे जो पठाण या शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटामधील टायटल ट्रॅकवर मैदानातच डान्सही केला होता.


नक्की वाचा >> भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'


वर्ल्डकपसाठी तयार असल्याचे संकेत


सध्या शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या 'डुंकी' चित्रपटाचं काम करत असून विराट कोहली हा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपसाठी सज्ज झाला आहे. शाहरुखने विराटला जावयासारखा असल्याचं म्हटलं त्याच दिवशी विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या राजकोटमधील एकदिवसीय सामन्यामध्ये अर्धशतक झळावत आपण वर्ल्डकपसाठी तयार असल्याचे संकेत दिले.