भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'

Pakistan Team Arrived In India Babar Azam Instagram Story: भारतामध्ये दीड महिने चालणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पाकिस्तानचा संघ दुबई मार्गे बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी असं काही पाहिलं की पाकिस्तानी संघातील सर्वच खेळाडू इम्प्रेस झाले आहेत. अनेकांनी यासंदर्भातील इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यात. पाहूयात याच इन्स्टा स्टोरीज...

| Sep 28, 2023, 12:14 PM IST
1/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी खेळाडू भारताने केलेल्या स्वागताची भूरळ

2/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे.

3/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं.

4/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

हैदराबादमधील हॉटेलमध्ये भगव्या रंगाची शाल देऊन बाबर आझम आणि त्याच्या सहकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं.

5/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी पॅण्ट असा लूकमध्ये बाहेर पडला.

6/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

7/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघाला प्रचंड सुरक्षेमध्ये विशेष बसने विमानतळावरुन हॉटेलवर नेण्यात आलं.  

8/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघ विमानतळावरुन बाहेर पडताना अनेक क्रिकेट चाहत्यांनी भारताच्या या कट्टर प्रतिस्पर्धांचं स्वागत केलं. 

9/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

विमानतळावर पाकिस्तानी संघाचं चाहत्यांनी स्वागत केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

10/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघ बाहेर पडताना चाहत्यांनी मोबाईलमधून त्यांचे फोटो काढले, आरडाओरड करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

11/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघाला भारतात मिळालेला हा प्रतिसाद पाहून पाकिस्तानी खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला.

12/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

यासंदर्भात शाहीन आफ्रिदी, बाबर आझमबरोबरच अन्य पाकिस्तानी खेळाडूही सोशल मीडियावरुन व्यक्त झाले आहेत.

13/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. 'इथल्या लोकांनी फार छान स्वागत केलं. सर्वकाही अगदी व्यवस्थित आहे. पुढील दीड महिन्यांचा इथल्या मुक्कामाबद्दल उत्साही आहे,' असं रिझवानने म्हटलं आहे.

14/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

शाहीन शाह आफ्रिदीनेही इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केला आहे. हैदराबाद, इंडिया असं लोकेशन पोस्ट करत आफ्रिदीने, "आतापर्यंत आमचं फार उत्तम स्वागत झालं आहे," असं म्हटलंय.

15/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

तर, 'हैदराबादमधील प्रेम आणि पाठिंबा पाहून गहिवरुन आलं आहे,' अशा कॅप्शनसहीत बाबरने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. 

16/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

पाकिस्तानी संघ आज न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये पहिला सराव सामना खेळणार आहे. यासाठी त्यांनी आज सकाळपासून सरावही सुरु केला आहे.

17/17

Pakistan Team Arrived In India Babar Azam Pakistani Players Instagram Story

शाहीन आफ्रिदीसहीत अनेक पाकिस्तानी गोलंदाजी यामध्ये सहभागी झाले.