सोलन: हिमाचल प्रदेश सोलन येथील पोलीस मैदानावर शनिवारी एक अनोखा सामना पहायला मिळाला. पोलीस मैदानात सुरू असलेल्या 'दि ग्रेट खली शो'ची धमाकेदार सुरूवात झाली. या शोची सुरूवात राखी सावंतच्या हॉट आणि तितक्याच बोल्ड अंदाजात झाली. राखी सावंत कार्यक्रमाचे निवेदन करत होती. राखीने रिंगमध्ये आपला जलवा दाखवला. तिची अदा पाहून प्रेक्षकांनीही मग तिला चांगलेच डोक्यावर घेतले. दरम्यान, अमेरिकी वंशाची महिला रेसलर केटी फोर्ब्सनेही डान्स करत आपला जलवा दाखवला. प्रेक्षकांनी दोघींनाही चांगली पसंती दिली. 


कुस्तीच्या आखाड्यात राखीला ओपन चॅलेंज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केटी आणि राखीचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दरम्यान, केटीने राखीला तिच्यासोबत डान्स करण्याचे उघड आव्हान दिले. मग राखीनेही हे आव्हान तत्काळ स्वीकारले. दोघींचे ठूमके पाहण्यासाठी प्रेक्षकही चांगलेच उतावीळ झाले होते. रिंगमध्ये दोघींनी साधारण १० मिनिटे सोबत डान्स केला.


'राखी सावंत बाकीं ओ..'


दरम्यान, केटी आणि राखीचा डान्स सुरू असताना गायक दिलीप सिरमौरी रिंगमध्ये पोहोचला. त्यानेही मग कार्यक्रमात सहभागी होत लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याने 'राखी सावंत बाकीं ओ' गाण्याची सुरूवात करताच लोक थिरकायला लागले. पण, या गाण्यावर ठेका धरताना लोकांना आपले हसूही आवरत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे राखीने स्वत:ही दिलीप सिरमौरीच्या गाण्यावर ठूमके लावले.



दरम्यान, याच रिंगमध्ये सुमारे ४० रेसलर्सनी आपली फाईट दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यात ३ विदेशी महिला रेसलर्ससोबत सुमारे पुरूष रेसलर्सचाही समावेश होता. देशभरातून सुमारे २५ रेसलर्स फाईटमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.