मुंबई : आयपीएलमध्ये आपल्या घातक बॉलिंगने हैदराबादला मॅच जिंकवून देणाऱ्या खेळाडूसाठी अखेर टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. उमरान मलिक टीम इंडियातून खेळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

150 किमी प्रति तासाने बॉलिंग करणाऱ्या या खेळाडूने स्वत:चा रेकॉर्ड गुजरात विरुद्धच्या सामन्यात मोडला. त्याने 153.3 किती वेगानं बॉल टाकला होता. जम्मू-काश्मीरच्या उमरानकडे घातक बॉलर म्हणून पाहिलं जातं. 


उमरान टीम इंडियातून खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे मात्र अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. जूनमध्ये होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 आणि आयर्लंड विरुद्धच्या 2 टी 20 सामन्यात टीम इंडियाकडून तो खेळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
उमरानची दोन महिन्यात टीम इंडियामध्ये एन्ट्री होऊ शकते. टीम इंडिया 9 ते 20 जून दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. त्यानंतर 26 ते 28 जून आयर्लंड विरुद्ध 2 टी 20 सामन्यांची सीरिज खेळणार आहे. 


आयर्लंड सीरिजसाठी अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं टीम इंडियाची मोटबांधणी सुरू आहे. त्यामुळे कसलेले खेळाडू निवडणं, युवा खेळाडूंना त्यांची कामगिरी पाहून संधी देणं हे रोहित शर्मा आणि निवड समितीसमोर आव्हान असणार आहे.