Sport News : भारत आणि बांगलादेशमध्ये (indvsban) पार पडलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी असल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी के. एल. राहुलकडे देण्यात आली. राहुलच्या कर्णधारपदावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. आर. आश्विन ( R. ashwin)  हा एक चपळ खेळाडू असून त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट राहिलं असल्याचं दानिशने कनेरियाने म्हटलं आहे. यूट्यूब चॅनलवर तो बोलत होता. बांगलादेश आणि भारतामधील दुसरा कसोटी सामन्यात भारताच्या 7 विकेट्स गेल्या असताना आर. आश्विनने आणि श्रेयस अय्यरसोबत नाबाद भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. (danish kaneria on ravichandran ashwin as a captain of indian test teamn latest marathi sport news)


भारतावर खूप दबाव होता त्या परिस्थितीमध्ये त्याने संयमी खेळी करत संघाला सावरत शानदार खेळी केली. याआधीही त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीतून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती, असंही दानिश कनेरियाने म्हटलं आहे. 


दरम्यान, बांगलादेशविरूद्ध भारताच्या 74 धावांवर 7 विकेट्स गेल्या होत्या. आश्विनने अय्यरला साथ देत नाबाद 42 धावांची खेळी केली होती. आश्विनही बाद झाला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. दबावात परिस्थिती कशा प्रकारे हाताळायची आणि डाव सावरायचा हे आश्विन माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात शिकला होता. धोनीनेही अनेकदा विकेट्स पडल्या असताना तळाच्या फलंदाजांना हाताशी पकडत संघाला मोठी धावसंख्या उभारली होती तर काहीवेळा विजयही मिळवून दिला होता.