Darren Sammy : एक नव्हे तर दोनवेळा T20 चॅम्पियन असणारी वेस्ट इंडीज (West Indies) टीम यंदा वर्ल्डकप खेळायला सुद्धा क्वालिफाय होऊ शकली नाही. त्यामुळे अनेकांनी वेस्ट इंडिजवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागतोय. अशातच आता वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन डॅरन सॅमी (Darren Sammy Statement On decline of West Indies cricket) याने खंत बोलून दाखवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे (Team India) लिस्ट A प्लेयर्स वर्षाला 7 कोटी कमवतात, तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचे लिस्ट A प्लेयर्स वर्षाला कसेबसे 1 कोटी कमावतात. जर कोणी चांगले पैसे देत असेल तर प्लेयर्स तिकडेच जाणार... प्रेमापोटी क्रिकेट खेळण्याचे दिवस आता गेले. प्रेमाने पोट भरत नाही, असं भावूक वक्तव्य डॅरन सॅमीने (Darren julius garvey sammy) केलंय.


दरम्यान, क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने खंत बोलून दाखवल्यानंतर अनेकांनी गहिवरून आलं. श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सच्या तुलनंत लहान क्रिकेट बोर्ड्स मात्र मागं पडत चाललं आहेत अशी भावना डॅरेन सॅमीच्या डोळ्यांत स्पष्ट दिसली होती. त्यामुळे अनेक टीकाकारांची बोलती बंद झाली आहे.


आणखी वाचा - T20 World Cup : अचानक Warner राईटी खेळायला लागला अन् झालं असं काही की....बॉलरही पोटधरून हसला!


दरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील फायनल  (T20 World Cup 2022 Final) खेळली जाईल, असं भाकित जागतिक क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस (Universal boss) ख्रिस गेलने वर्तवलं. मात्र, वेस्ट इंडिजला पात्रता फेरीत प्रवेश करता न आल्याने ख्रिस गेलंच भाकित सत्यात उतरू शकलं नाही.