David Warner: ...अन् भर मैदानात वॉर्नरला कोसळलं रडू; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
David Warner Test Retirement: सिडनीमध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्ट सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) खूप भावूक झालेला दिसला. सिरीज जिंकल्यानंतर मुलाखतीदरम्यान तो भर मैदानावर रडताना दिसला.
David Warner Test Retirement: ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सुरु असलेली 3 सामन्याची टेस्ट सिरीज कांगारूंनी आपल्या नावे केली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सिरीजसोबत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर डेविड वॉर्नरने ( David Warner ) देखील टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. पाकिस्तान विरूद्धचा हा सामना त्याचा शेवटचा टेस्ट सामना असून सामना जिंकल्यानंतर त्याला भर मैदानात रडू कोसळलं आहे.
सिडनीमध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्ट सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) खूप भावूक झालेला दिसला. सिरीज जिंकल्यानंतर मुलाखतीदरम्यान तो भर मैदानावर रडताना दिसला. डेव्हिड वॉर्नरने ( David Warner ) पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. डेव्हिड वॉर्नरची फेअरवेल टेस्ट मॅच सिडनीमध्ये खेळली गेली. वॉर्नरचा ( David Warner ) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
भर मैदानात वॉर्नरला कोसळलं रडू
ऑस्ट्रेलियन टीमने सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टेस्ट सामन्यात विजय मिळवून डेव्हिड वॉर्नरला निरोप दिला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियाच्या टीमने तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये पाकिस्तानला 3-0 असा व्हाईटवॉश दिला आहे. यानंतर आता डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेट खेळताना दिसणार नाही.
सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन टीमच्या विजयानंतर जेव्हा कॉमेंट्रिटरने वॉर्नरला ( David Warner ) प्रश्न केले तेव्हा त्याला भरपूर काही बोलायचे होतं. मात्र तो अचानक भावुक झाला.
वॉर्नरचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अश्रू पुसत डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) अचानक वळला आणि टीमच्या इतर खेळाडूंकडे गेला. डेव्हिड वॉर्नरही मैदानावर पत्नीला मिठी मारताना दिसला. सिडनी क्रिकेट मैदानावर पत्नीला मिठी मारल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाला होता. यावेळी त्याने त्याच्या तीन मुलींना मिठी मारली.
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय
सिडनी टेस्ट सामना पाकिस्तानच्या हातून निसटला. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर 130 रन्सचं लक्ष्य होतं. ऑस्ट्रेलियाने केवळ 2 विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं. या विजयासोबत तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये पाकिस्तानचा 3-0 असा व्हाईटवॉश दिला. पाकिस्तान टीमने 1999 पासून ऑस्ट्रेलियात सलग 17 टेस्ट सामने गमावले आहेत.