मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात काही चांगली झालेली दिसत नाहीये. सोमवारी हैदराबादला लखनऊ सुपर जाएंटसकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात अवघ्या 12 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. यानंतर केन विलियम्सनच्याही कर्णधारपदावर टीका होऊ लागल्यात. यानंतर हैदराबादच्या चाहत्यांनी डेव्हिड वॉर्नरला पुन्हा टीममध्ये आणण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊविरूद्धच्या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन टीमच्या परफॉर्मसन्समुळे खूप निराश झाल्याची दिसली. यावेळी सोशल मीडियावर तिचे खूप फोटोही व्हायरल झाले. यावेळी चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिला डेव्हिड वॉर्नरला टीममध्ये पुन्हा आणण्याची मागणी केली आहे. 



यावेळी चाहत्यांनी दोन सामने हरल्यानंतर सनरायझर्सला ट्रोलही केलंय. तर काही युझर्सने bring back वॉर्नर असं म्हणत ट्विट्स केले आहेत. शिवाय एका युझरने काव्या मारन संपूर्ण सिझन दुःखी राहणार असल्याचं म्हटलंय. 




आयपीएल 2021मध्ये खराब प्रदर्शनामुळे वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं. या काळात कोच टॉम मूडी आणि वॉर्नर यांच्यामध्ये संबंध योग्य नसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. यानंतर केन विलियम्सनकडे टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र केनला देखील कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. 


या सर्व प्रकारानंतर सनरायझर्सने डेव्हिड वॉर्नरला रिलीज केलं. वॉर्नरने प्रत्येक सिझनमध्ये 500 हून अधिक रन्स केले होते. असं असताना देखील हैदराबाद फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलं नाही. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रूपयांना वॉर्नरला आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं.