मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2022 चा विश्वचषक संपला (T20 World Cup 2022) आहे आणि बहुतेक खेळाडू हे आता थोडा क्वालीटी टाईम घालवत आहेत. डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच डेव्हिडनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डेव्हिडनं साडी नेसली असून त्यानं दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिकाच्या गाण्यावर (Rashmika Mandana) डान्स केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये डेव्हिड वॉर्नर साडी आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत डेव्हिडनं माफ करा, असं कॅप्‍शन दिलं आहे. खरंतर, तो रश्मिका मंदान्नाच्या गाण्यात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. युवराज सिंगने वॉर्नरच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं की, 'तुझा यापेक्षा चांगला लूक कधीही दिसला नाही.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ऑस्ट्रेलियन खेळाडू इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर खूप सक्रिय असतो आणि जोरदारपणे व्हिडिओ आणि रील्स बनवतात. याआधीही त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील बनवले आहेत. एकदा त्यानं सपना चौधरीच्या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओही शेअर केला होता. (David Warner Dances To Rashmika Mandanna s Whattey Beauty Song With A Twist Watch The Viral Video) 


हेही वाचा : Govinda च्या 'हत्या' चित्रपटात राज भूमिका 'ते' धनुषसोबत लग्न 'या' अभिनेत्रीचे फोटो व्हायरल


टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये वॉर्नर इतका चांगला खेळू शकला नाही, पण यंदाच्या आयपीएलमध्ये तो चांगला खेळणार अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. सध्या वॉर्नर इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.