मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. विराटच्या चाहत्यांसाठी ही फार चिंतेची बाब आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही विराटचा चांगला खेळ होताना दिसत नाहीये. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने विराटला फॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला खराब फॉर्ममधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना वॉर्नरने विराटला अजून काही मुलांना जन्म देण्यास सांगितलं आहे.


कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला की, विराट कोहलीने कठीण काळात त्याच्या मूलभूत गोष्टींवर ठाम राहिलं पाहिजे. मी स्वतः देखील या टप्प्यातून गेलो आहे. वॉर्नरच्या म्हणण्याप्रमाणे, तू अजून काही मुलांना जन्म दे, आयुष्य आणि क्रिकेटचा आनंद घे.



विराटने अजून काही मुलांना जन्म द्यावा आणि प्रेमाचा आनंद घ्यावा. फॉर्म हा तात्पुरता आहे आणि क्लास हा कायमस्वरूपी मानला जातो. जगातील प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत असं घडतं. तुम्ही कितीही चांगले खेळाडू असलात तरी तुमच्यात हा चढ-उतार नेहमीच असतो, असंही वॉर्नरने सांगितलं आहे.


सध्या विराटला चांगला खेळ दाखवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. त्याच्या खराब कामगिरीबाबत बोलताना विराटचा माजी सहकारी एबी डीविलियर्सने त्याच्या मानसिकतेला जबाबदार ठरवलं होतं. कोहलीला खराब फॉर्ममधून पुनरागमन करणं आव्हानात्मक असल्याचंही एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केलं होतं.