मुंबई : पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने 17 धावांनी सामना जिंकला. लियाम लिविंगस्‍टोनने डेव्हिडला पहिल्याच बॉलवर गोल्डन डक झाला. गोल्डन डक होण्यामागचे वॉर्नरची चूक असल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हिड वॉर्नर जास्त हुशार बनण्याच्या नादात आऊट झाला. सरफराजही वॉर्नरच्या या निर्णयामुळे खूश नव्हता. त्याचा फटका टीमला बसला. डेव्हिड वॉर्नरने अशी कोणती हुशारी दाखवली ज्याचा फटका त्याला बसला आहे. 


पूर्वनिश्चित नियोजनेनुसार, डेव्हिड वॉर्नरला नॉन-स्ट्रायकर एंडला उभे राहावं लागणार होतं आणि सरफराजला डावाची सुरुवात करायची होती. मयंक अग्रवालने शेवटच्या क्षणी पहिला ओव्हर लिव्हिंगस्टोनला करण्याची जबाबदारी दिली. 



वॉर्नरला गोलंदाजीतील बदलाची माहिती मिळताच त्याने सरफराजला त्याने एन्ड स्ट्राईकवर जायला सांगितलं आणि तो ओपनिंगला उतरला. त्याचा फटका त्याला बसला. 


या सामन्यात दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी सलामीला आलेल्या सरफराज खानला ओपनिंग करायची होती. वॉर्नरचा निर्णय त्याने मान्य केला आणि आयत्यावेळी झालेल्या बदलानंतर वॉर्नरला त्याचा फटका बसला.