सिडनी : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट मॅचवेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला. या दोघांमध्ये हाणामारी व्हायचीच बाकी होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यानंतर आता डेव्हिड वॉर्नरनं या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिकॉकनं माझ्या पत्नीबाबत अभद्र टिप्पणी केल्यामुळे मी चिडलो आणि त्याच्या अंगावर धावून गेलो, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे. मी नेहमीच माझ्या कुटुंबाच्या बाजूनं उभा राहिन, असं वक्तव्य डेव्हिड वॉर्नरनं केलं आहे. ड्रेसिंग रूममध्ये जाताना डिकॉकच्या वक्तव्यानंतर माझा ताबा सुटला, अशी कबुली डिकॉकनं दिली. दुसऱ्या टीमच्या खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी माझ्यावर टिप्पणी केली तरी मला फरक पडणार नाही पण पत्नीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माझा पारा चढला, अशी प्रतिक्रिया डिकॉकनं दिली. झालेल्या प्रकाराबद्दल मला खेद आहे, असंही वॉर्नर म्हणाला.


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली. चहापानावेळी ड्रेसिंग रूममध्ये जात असताना वॉर्नर आणि डिकॉकमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आयसीसीनं वॉर्नरची ७५ टक्के मॅच फी कापली. तसंच त्याच्या खात्यामध्ये ३ डिमेरिट पॉईंट दिले. डिकॉकवरही कारवाई म्हणून २५ टक्के फी कापण्यात आली.