WPL 2023: महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा विजय झाला. मुंबईने दिल्लीचा 8 विकेट्स राखून विजय मिळवला. दिल्लीचा पराभव करत मुंबईच्या टीमने विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. अवघ्या 15 ओव्हर्समध्ये मुंबईच्या टीमने दिल्लीने दिलेलं लक्ष्य पार केलं आहे. 


दिल्लीची टॉस जिंकून प्रथम फलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लैनिंग (Meg Lanning) ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरला नाही. फलंदाजीला आलेल्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली. अवघ्या 5 रन्सवर 3 प्रमुख खेळाडू पव्हेलियनमध्ये परतले होते. दिल्लीकडून कर्णधार मेगने सर्वाधिक 43 रन्सची खेळी केली. तर भारताची जेम्मिमा रॉड्रिग्सने 25 रन्स केले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. 


105 रन्सवर दिल्ली ऑलआऊट


मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. मुंबईकडून सायका इशाक, इस्सी वोंग आणि हीली मॅथ्यूज या तिघींनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तर पूजा वस्त्राकरला एक विकेट काढण्यात यश आलं. अशा पद्धतीने अवघ्या 18 रन्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचा 105 रन्समध्ये ऑलआऊट केला. 


मुंबई इंडियन्सचा विजय


105 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 2 विकेट्स गमावले. मात्र अगदी सहजरित्या टीमने हे लक्ष्य पार केलं. मुंबईकडून यास्तिका भाटीयाने 41, हीली मॅथ्यूजने 32 आणि सीवर ब्रन्ट 23 रन्सची खेळी केली. या विजयाने मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.